बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची जागा निश्चित; ‘या’ ठिकाणी उभा राहणार पुतळा

मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असून शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जागा निश्चित झाली आहे. यासंबंधी गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट या इमारतीसमोरील महात्मा गांधी रोड, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात येणार आहे.

फोर्ट परिसरात बाळासाहेब ठाकरेंचा नऊ फुटी पुतळा उभारण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बैठकीत मांडला होता. त्यामुळे आता बाळासाहेबांच्या स्मारकाची जागा निश्चित झाली आहे.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचं 17 नोव्हेंबर 2012 साली निधन झाले होते. ठाकरे यांनी 1966 साली शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. उत्तम वकृत्व आणि रोखठोक संभाषण यासाठी ते ओळखले जातात.

महत्त्वाच्या बातम्या-