पंकजा मुंडे यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य म्हणाले…

पुणे | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे ठाकरे सरकार फडणवीस सरकारने घेतलेले बरेच निर्णय रद्द करत नवीन निर्णय घेत आहे. तर दुसरीकडे अनेक नेते भाजप पक्षाला रामराम ठोकत आहेत. नुकतंच भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. खडसेंनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजपला रामराम ठोकणार अशा चर्चा चालू होत्या. पंकजा मुंडे यांनी या चर्चांना साफ नकार दिला होता. मात्र, पंकजा मुंडे यांच्या एका ट्वीटनं त्यांच्या पक्षांतराचा चर्चांना पुन्हा तोंड फुटलं आहे.

राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या प्रश्नांसंदर्भात पुण्यातील वसंतदादा शुगर इंस्टीट्युट येथे बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी एक ट्वीट करत शरद पवारांना सलाम ठोकला. पंकजा मुंडे यांच्या या ट्वीटनंतर त्यांच्या पक्षांतराविषयी पुन्हा चर्चा चालू झाल्या. पंकजा मुंडे यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना काल पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

मी देखील कित्येकवेळा शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. शरद पवार या वयात किती प्रवास करतात. शेती आणि सहकारी क्षेत्रातील पवार यांचं ज्ञान याविषयी मी देखील अनेकवेळा बोललो आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

तसेच आम्ही राज्यात मंत्री असताना सामन्यांच्या प्रश्नांसाठी ते फोन करून चर्चा करायचे. आता चांगल्याला चांगलं म्हणणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. भाजपने ही संस्कृती उचलली आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारने ही संस्कृती उचलली नाही. या सरकारने फडणवीस सरकारने केलेले सगळं रद्द केले, असंही पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाकाळात शरद पवार सातत्यानं आपलं काम करत आहेत. महामा.रीच्या काळातही ते अनेक लोकांच्या भेटीगाठी घेत दौरे काढत आहेत. शरद पवार यांच्या याच कामाला पंकजा मुंडे यांनी सलाम केला आहे. यासंबंधीत पंकजा मुंडे यांनी एक ट्विट केलं होतं.

शरद पवार हॅट्स ऑफ…कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपल्या बैठका आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटते. पक्ष, विचार, राजकारण जरी वेगळे असले तरी कष्ट करणाऱ्या विषयीचे आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.

पंकजा मुंडे यांचं हे ट्वीट वेगानं व्हायरल झालं होतं. शरद पवार यांना महाराष्ट्रातील जनतेने नेहमीच भरभरून प्रेम दिलं आहे. पवार महाराष्ट्रातील प्रत्येक माणसासाठी नेहमीच झटत राहिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

दिवाळीत फटाके फोडू नका; ‘या’ कारणामुळं तज्ज्ञांनी दिला सर्वात मोठा इशारा

सोनं खरेदी करणार असाल तर थोडं थांबा; मोदी सरकार आणतंय ‘ही’ मोठी योजना!

भाजपच्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलं काँग्रेसच्या पंजाला मतदान करण्याचं आवाहन!

फडणवीस सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला ठाकरे सरकारनं दाखवली केराची टोपली!

सुशांत प्रकरणी चालू झालेल्या ‘त्या’ वादावर अखेर सलमानने मौन सोडलं; शाहरुखचं नाव घेत म्हणाला…