चंद्रकांत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नेहमी आपल्या आक्रमक शैलीत महाविकास आघाडीत घटक पक्षांवर टीका करताना दिसतात. काहीवेळा त्यांनी टीका करताना वादग्रस्त वक्तव्य देखील केली आहेत.

आज कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे.

या निवडणुकीनंतर आता चंद्रकांत पाटील यांचं जुनं वक्तव्य चर्चेत आहे. भाजप हारली तर हिमालयात जाईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याची चर्चा आहे.

अशातच आता कोल्हापूरात झालेला पराभव आणि वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटलांना भोवण्याची शक्यता आहे. आजच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोल्हापूर हा चंद्रकांत पाटलांचा गड मानला जात होता. मात्र, मागील काही दिवसांपासून कोल्हापूरात भाजपला सात्त्याने पराभवाला समोरं जावं लागत आहे. त्यामुळे आता चंद्रकांत पाटलांना जोर का झटका लागू शकतो.

दरम्यान, महाराष्ट्र भाजपचा चेहरा म्हणून चंद्रकांत पाटलांचं नाव दिल्लीत घेतलं जातं. आता थेट प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आल्याने आता चंद्रकांत पाटलांचं टेन्शन वाढलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुन चंपा, सुन तारा! व्हिडीओ शेअर करत काँग्रेस नेत्याने उडवली चंद्रकांतदादांची खिल्ली

‘भुत पिशाच निकट नहीं आवे, जब…’; मिटकरींचा भाजपला खोचक टोला

मोठी बातमी! शरद पवारांच्या सभेत गोंधळ; जालन्यात भाषण सुरू असताना…

IPL 2022: कमाल लाजवाब राहूल! मुंबई इंडियन्स विरूद्ध के एल राहूलचं दमदार शतक

मुंबई-हरिद्वार-हिमायल! चंद्रकांत पाटलांसाठी राष्ट्रवादीकडून ‘एसी थ्री टायर’ तिकीट बूक