नवी दिल्ली | आयपीएलचा 15 वा हंगाम आता रंगतदार स्थित पोहोचला आहे. लिलावानंतर संघात बदल केल्याने आता आयपीएलमधील मजबूत संघाचं पारडं फिरताना दिसत आहे.
आयपीएलच्या सर्वात यशस्वी अशा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जला अद्याप सुरू गवसला नाही. तर नव्याने सामील झालेले लखनऊ आणि गुजरात संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहेत.
अशातच गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्या सध्या चर्चेत आहे. आता या मोसमात तो बॉल आणि बॅटने चमकदार कामगिरी करून दहशत निर्माण करताना दिसतोय. त्याच्या कर्णधारपदाचे क्रिकेट जगतातही कौतुक होतंय.
हार्दिकच्या झंझावाती कामगिरीनंतर माजी क्रिकेटपटू आणि बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी यांनी हार्दिकबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
सर्वात लहान फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणारा पुढचा खेळाडू कोण असेल?, यावर कधी वाद होत असेल तर तो हार्दिक पांड्याचा असेल, असं मनोज तिवारी म्हणाला आहे.
मी त्याला आयपीएलमध्ये क्वचितच नेतृत्व करताना पाहिलं आहे, परंतु मी त्याच्यावर खूप प्रभावित असल्याचं देखील मनोज तिवारीने म्हटलं आहे.
दरम्यान, लखनऊ संघाने पहिल्याच हंगामात चांगली कामगिरी केली आहे. राशिद खान, मॅथ्यू वेड, लाॅकी फर्ग्यूसन यांसारख्या खेळाडूंनी गुजरातला मोठे सामने जिंकून दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
चंद्रकांत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुन चंपा, सुन तारा! व्हिडीओ शेअर करत काँग्रेस नेत्याने उडवली चंद्रकांतदादांची खिल्ली
‘भुत पिशाच निकट नहीं आवे, जब…’; मिटकरींचा भाजपला खोचक टोला
मोठी बातमी! शरद पवारांच्या सभेत गोंधळ; जालन्यात भाषण सुरू असताना…
IPL 2022: कमाल लाजवाब राहूल! मुंबई इंडियन्स विरूद्ध के एल राहूलचं दमदार शतक