मुंबई | अलिकडे तुम्ही जनधन खात्याविषयी नक्कीच ऐकलं असेल. जनधन खात्याचे अनेक फायदे आहेत. जनधन खाते असणाऱ्या ग्राहकांसाठी सरकार अनेक नवनवीन योजना आणत असतं. कोरोनाकाळात लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने तीन हप्त्यांमध्ये जनधन खाते असणाऱ्या ग्राहकांच्या खात्यावर 1500 रुपये देखील टाकले होते.
तुम्हीही तुमचे जनधन खाते लगेच उघडू शकता. तसेच जर तुमचं कोणत्याही बँक अकाऊंटमध्ये खाते असेल तर ते देखील तुम्ही जनधन खात्यात ट्रान्सफर करू शकता. याची पद्धत देखील अतिशय सोपी आणि सोयीस्कर आहे.
जर कोणत्या बँकेत तुमचं अगोदरच खाते असेल तर त्या बँकेत तुम्हाला फक्त रूपे कार्डसाठी अर्ज करावा लागेल. हा अर्ज भरल्यानंतर तुमचे खाते लगेचच जनधन योजनेत ट्रान्सफर होईल.
तसेच जर तुम्हाला जनधन योजनेअंतर्गत नवीन खाते उघडायचे असेल तर त्याची देखील अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हाला नव्यानं जनधन योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी कोणत्याही बँकेच्या वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करून घ्यावा लागेल.
यानंतर हा फॉर्म भरून काही नॉर्मल कागदपत्रांसह तो बँकेत जमा करावा लागेल. ही प्रोसेस तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता.
जनधन खात्यात ओव्हरड्राफ्ट सुविधेसह रूपे डेबिट कार्डची सेवासुद्ध उपलब्ध आहे. जनधन सुविधेअंतर्गतच्या या डेबिट कार्डवर तुम्हाला 1 लाख रुपये पर्यंतचा अपघात विमा मिळतो.
तसेच ज्या ग्राहकांनी 28/8/2018 नंतर खाते उघडलं आहे त्या ग्राहकांना अपघात विमा वाढवून 2 लाख रुपायापर्यंत करण्यात आला आहे. या कार्डवर 30000 रुपयांचे विनामूल्य जीवन विमा संरक्षण देखील देण्यात आले आहे.
दरम्यान, सर्व खातेधारकांचे आधार कार्ड नंबर 31 मार्च 2021 पर्यंत बँकांनी लिंक करून घ्यावेत, अशा सूचना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना दिल्या आहेत. तसेच ज्या बँक अकाउंटला पॅनकार्ड नंबर आवश्यक आहेत. त्या खात्यांना 31 मार्च 2021 पर्यंत पॅनकार्ड लिंक करून घेण्याचे आदेश देखील निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आमीर खान ‘या’ बड्या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता!
‘अल्लाह’साठी चित्रपट सृष्टी सोडणाऱ्या सनाने ‘या’ मौलवींशी निकाह केला, व्हिडिओ व्हायरल
भारतीय टीममध्ये निवड न झाल्यानं संतापलेला सुर्यकुमार रोहितसमोर मन मोकळे करत म्हणाला…
सुशांतच्या 17 कोटींचा घोटाळा आणि दिनेश विजयन यांचा संबंध काय? वाचा सविस्तर
अंकिता पुन्हा सुशांतच्या आठवणींना उजाळा देत टेलिव्हिजनवर सुशांतसाठी करणार ‘ही’ गोष्ट