मी जगेन की नाही याची शाश्वती नव्हती… पण आज सगळ्यांच्या आशीर्वादाने मंत्री झालोय”

मुंबई | मला आज विश्वास बसत नाही. काही दिवसांपूर्वी मी जगेन असं वाटत नव्हतं, पण नियतीचा खेळ वेगळा आहे. आज मी सर्वांच्या साक्षीने मंत्री झालो आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

माझ्यासोबत जे झालं ते मला विसरता येणार नाही, मात्र मी कोणासोबत सुडबुद्धीने वागणार नाही. माझ्यासोबत कोण आकसाने वागले म्हणून मी त्यासोबत तसाच वागणार नाही, असंही ते म्हणाले आहेत. ते एक वृत्तवाहिनीशी बोलत होते.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणायचे विरोधक संपले आहेत. मात्र, आज तेच लोक आमच्या विरोधात बसले आहेत. आमचं काही चुकलं तर सांगा, पण विरोधासाठी विरोध चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत सहा जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यात राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचाही समावेश आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-