दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ चित्रपट टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली | अभिनेत्री दीपिका पादुकोणचा बहुचर्चित चित्रपट छपाक 10 जानेवारी म्हणजे आज प्रदर्शित झाला आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटावर कुठल्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही, अशी घोषणा मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी यासंर्भात ट्विट केलं आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पुदुचेरीतील जनतेला हा चित्रपट टॅक्स फ्री पाहता येणार आहे.

छपाक हा चित्रपट अ‌ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटातून पीडित महिलांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना हा चित्रपट पाहता यावा यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री कमलनाथ आणि  बघेल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जेएनयूमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यामुळे दीपिका सध्या चर्चेत आहे. तसेच  छपाक या चित्रपटावर बहिष्कार घाला असं आवाहन काहींनी केल्याने चित्रपट अडचणीत आला आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-