नवी दिल्ली | अभिनेत्री दीपिका पादुकोणने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला भेट दिल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यामुळे तिचा आगामी चित्रपट ‘छपाक’ला विरोध करण्याची मोहिम ट्रोलर्सनी राबवली आहे. अशातच भाजपच्या एका नेत्याने दीपिकाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
मुंबईमध्ये थांबून अभिनेत्रीने केवळ डान्स केला पाहिजे. तिला जेएनयू मध्ये जाण्याची काय गरज होती हेच मला कळलं नाही. स्वतःला कार्यकर्ते आणि कलाकार म्हणवणारे खूप लोक तयार झाले आहेत, असं भाजप नेते गोपाल भार्गव यांनी म्हटलं आहे. याबाबतचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिलं आहे.
सोशल मीडियावर #Boycottchhapaak असा हॅशटॅग दीपिकाच्या सिनेमाविरूद्ध चालवण्यात आला होता. तसेच लोकांनी तिचा आगामी ‘छपाक’ हा चित्रपट पाहू नये, असंही आवाहन करण्यात येत होतं. याच्यावर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल, रणदिप सुरजेवाला, पवन खेडा यांच्यासह अनेक नेत्यांनी टीका केली होती.
दरम्यान, भारताच्या आत्म्याला चिरडणे बंद करा, तुम्ही कोणत्याही कलाकाराला विरोध करु शकत नाही. ‘छपाक’ हा चित्रपट पदुकोणचाच नाही तर ज्या हजारो महिलांवर अॅसिड हल्ले झाले त्यांचाही आहे, असं सिब्बल यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ चित्रपट टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा – https://t.co/3pg7uG2G7j @deepikapadukone @OfficeofUT @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020
…म्हणून मी पदभार स्वीकारण्यास उशीर केला; विजय वडेट्टीवारांचा खुलासा – https://t.co/dbkH00hEob @OfficeofUT @ShivSena @INCIndia
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020
हृतिक रोशन ठरला वयाच्या 45व्या वर्षीआशियातील सर्वात सेक्सी पुरुष – https://t.co/VZbVHvZKNi @iHrithik @Bollyhungama
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020