मुख्यमंत्र्यांनी सांगलीला येताना कडकनाथ कोंबड्यांचे पैसे घेऊन यावे- रघुनाथदादा पाटील

सांगली |  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा उद्या सांगलीत पोहोचते आहे. मुख्यमत्र्यांनी उद्या सांगलीत येताना कडकनाथ कोंबडीचे पैसे घेऊन या… नाहीतर येऊच नका, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली आहे.

कडकनाथ कोंबडी पालनात गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवून रयत अ‌ॅग्रो इंडिया कंपनीने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. या पाठीमागचा सुत्रधार कोण आहे हे शासनाने लवकरात लवकर शोधावं, अशी मागणी रघुनाथदादा पाटील यांनी यावेळी केली.

सामान्य माणसांनी आणि शेतकऱ्यांनी रूपया-रूपया गोळा करून कडकनाथमध्ये पैसे गुंतवले होते. याच शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्यांची फसवणूक झाली आहे. यांना न्याय कधी मिळणार? असा सवाल यावेळी रघुनाथदादा यांनी केला.

कडकनाथवर सांगली जिल्ह्यातील एकही नेता बोलत नाही. मुग गिळून का सगळे शांत बसलेत. यावरून फक्त राजकारण करतायेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री आता महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात येतच आहेत तर त्यांनी कडकनाथचे पैसे घेऊन यावेत, असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-