सर्वसामान्यांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमायला लावणारा अर्थसंकल्प- उद्धव ठाकरे

मुंबई | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं असून अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांची निराशा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

देशाच्या विकासाचं इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर या अर्थसंकल्पाने अन्याय केला आहे, अशी पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी आजच्या अर्थसंकल्पावर दिली आहे. IDBI आणि LIC मधील भागीदारी विकणं आणि रेल्वेचे खासगीकरणाचा शासनाचा निर्णय म्हणजे देशाच्या खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचे दर्शन घडवतात, असंही ते म्हणाले आहेत.

सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून युवा, शेतकरी आणि सर्वसामान्यांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमायला लावणारा असा हा अर्थसंकल्प आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करणारा आहे, असं म्हणत भाजप नेत्यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अर्थमंत्र्यांचं 162 मिनिटांचं भाषण… गुंतवणूकदारांना 4 लाख कोटी रूपयांचा झटका!.

-‘या देशात फक्त हिंदूंची चालणार’; शाहीनबागमध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचं वक्तव्य

-शेतीसाठी निधीची तरतूद अत्यंत कमी; अर्थसंकल्पावरुन राजू शेट्टींची टीका

-…म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पूर्ण अर्थसंकल्प वाचताच आला नाही!

-मोदी सरकार मुलींच्या लग्नाचं वय बदलणार???

-केंद्र सरकारची पुन्हा राजधानीकरांना सावत्रपणाची वाग