फडणवीस सरकारने रेडिओ अन् टीव्ही वाहिन्यांवर केलेल्या जाहिरातीचे धक्कादायक आकडे वाचून डोळे विस्फारतील!

मुंबई | बारामतीच्या नितीन यादव यांनी माहिती अधिकाराअंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत महाराष्ट्र शासनाच्या टीव्ही व रेडिओ वाहिन्यांवरुन जाहिरात प्रसिद्धीकरीता करण्यात आलेल्या खर्चाची माहिती मागवली होती. यावरुन धक्कादायक माहिती समोर आली आहे.

फडणवीस सरकारने रेडिओ व टीव्ही वाहिन्यांवर केलेल्या जाहिरातीचे धक्कादायक आकडे उघड झाले आहेत. फडणवीस सरकारने आपल्या कार्यकाळात जाहिरातीवर प्रचंड खर्च केल्याचं या आकडेवारीवरुन दिसत आहे. विशेष म्हणजे  रेडिओ व टीव्ही वाहिन्यांवर केलेल्या जाहिरातीचा खर्च 2013-2014 पासून वाढतच गेल्याचं दिसत आहे.

रेडिओ वाहिन्यांवर जाहिरातीवर केलेला खर्च 2013-2014 साली 59, 96, 291 रुपये इतका होता, तो वाढून 2018-2019 साली 1,85,72, 887 झाल्याचं दिसत आहे. तर टीव्ही वाहिन्यांवर जाहिरातीसाठी केलेला खर्च 2013-2014 साली 53,25,730 रुपये होता, तो 2018-2019 साली वाढून तब्बल 2,84, 48, 317 रुपये झाला आहे.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फडणवीस सरकारे केलेल्या जाहिरातीवर अनेकदा आक्षेप घेत विरोध केला होता. मात्र, लोकांसाठी केलेले कामं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या जाहिरातीचं समर्थन केलं होतं.83513314 478000553136504 2229563183150923776 n.jpg? nc cat=105& nc oc=AQkK9z3UWKwuUZgilKQ2yEXkIDFHPjJOsXdwoJoNWwG1VAXkqgXxnzp5EwzPv9uZ BU& nc ht=scontent.fbom5 1

महत्वाच्या बातम्या-

-सर्वसामान्यांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमायला लावणारा अर्थसंकल्प- मुख्यमंत्री.

-अर्थमंत्र्यांचं 162 मिनिटांचं भाषण… गुंतवणूकदारांना 4 लाख कोटी रूपयांचा झटका!.

-‘या देशात फक्त हिंदूंची चालणार’; शाहीनबागमध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचं वक्तव्य

-शेतीसाठी निधीची तरतूद अत्यंत कमी; अर्थसंकल्पावरुन राजू शेट्टींची टीका

-…म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पूर्ण अर्थसंकल्प वाचताच आला नाही!

-मोदी सरकार मुलींच्या लग्नाचं वय बदलणार???