एमआयएमच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांचं शिवसंपर्क अभियान सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदार आणि जिल्हा प्रमुखांशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी एमआयएमने दिलेल्या प्रस्तावावर भाष्य केलं आहे.

एमआयएम सोबत कोणतीही युती होणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगत उद्धव ठाकरे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

भाजपचं हिंदुत्व राजकारणासाठी आहे. आपलं हिंदुत्व हे देशाच्या हिताचं आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. याकडे दुर्लक्ष करू नका. विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका. विरोधकांचा डाव हाणून पाडा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यात एकामागोमाग एक घटना घडत आहेत. या सर्वांना आपण तोंड देत आहोत. मला एका जागी बसावं लागत आहे. पुण पुढच्या काही दिवसात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल. तुमची साथ आहे. त्यामुळे एका ठिकाणी बसून राज्याचे काम पुढे नेत आहे. महाविकास आघाडीचे निर्णय लोकांपर्यत पोहोचवा. विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

आपण लवकरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच दोन वर्षावर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसैना पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या.

 महत्त्वाच्या बातम्या- 

“येत्या काही दिवसात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल”

‘हा’ व्यवसाय सुरू करून महिन्याला कमवू शकता 50 हजार रुपये! 

मोठी बातमी! किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा, म्हणाले… 

लोकमान्यता असलेले जगातील पहिल्या क्रमांकाचे नेते ठरले पंतप्रधान नरेंद्र मोदी! 

Russia Ukraine War | रशिया सैन्यासंदर्भात अत्यंत धक्कादायक माहिती समोर