“देवेंद्रजी, चादर चढवताना आपला स्वाभिमान झुकला नाही का?”

मुंबई | मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना (Shivsena) आणि भाजप (Bjp) यांच्यात चांगलीच खडाजंगी पहायला मिळत आहे. एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली होती.

इम्तियाज जलील यांच्या ऑफरनंतर आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारलेलं आह, असं फडणवीस म्हणाले.

आम्ही पाहतोय सत्तेसाठी हे आणखी काय काय करत आहेत, असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावला आहे. शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार मनिषा कायंदे यांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

जनाब देवेंद्रजी, तेव्हा तुम्ही जनाब शब्दाबद्दल आक्षेप घेतल्याचं आठवत नाही. चादर चढवताना आपला स्वाभिमान झुकला नाही का?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

आताच का या शब्दाबद्दल एवढा राग? अरे हो, 105 आमदार निवडूनही भाजपा सत्तेत नाही, यामुळे तुमची अस्वस्थता आहे. नाही का?, असा खडा सवाल देखील त्यांनी विचारलाय.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचा नमाज पडतानाचा एक फोटो देखील मनिषा कायंदे यांनी शेअर केला आहे.

 महत्त्वाच्या बातम्या- 

एमआयएमच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“येत्या काही दिवसात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल”

‘हा’ व्यवसाय सुरू करून महिन्याला कमवू शकता 50 हजार रुपये! 

मोठी बातमी! किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा, म्हणाले… 

लोकमान्यता असलेले जगातील पहिल्या क्रमांकाचे नेते ठरले पंतप्रधान नरेंद्र मोदी!