मुख्यमंत्र्यांनी बनवली स्वत:च्या हातांनी स्वत:ची कॉफी… आव्हाडांनी शेअर केला व्हीडिओ

मुंबई |  महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा साधेपणा महाराष्ट्राने अनेकदा पाहिला आहे. अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमधून त्यांनी आपल्या साधेपणाचं दर्शन महाराष्ट्राला घडवलं आहे. आजही त्यांनी आपला साधेपणा जपला आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तो साधेपणा अलगद आपल्या कॅमेरात कैद केला. आव्हाडांनी यासंदर्भातला एक व्हीडिओ ट्वीट केला आहे.

उद्या सोमवारी विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आहे. त्याच्या पूर्वसंध्येला सरकारने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसहित अनेक मंत्री तसंच आमदारांची उपस्थिती होती.

आव्हाडांनी ट्वीट केलेल्या व्हीडिओमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: आपल्या हातांनी आपली कॉफी बनवताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या आजूबाजूला अनेक मंत्री आहेत तसंच अनेक सुरक्षारक्षक देखील आहेत पण त्यांनी स्वत:च्या हातांनी कॉफी बनवून ती कॉफी पिणं पसंत केलं.

दरम्यान, मुख्यमंत्री कॉफी बनवत असताना जितेंद्र आव्हाड मात्र त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते. आव्हाडांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांच्या याच साधेपणाचं कौतुक देखील केलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

-एल्गारच्या NIA तपासावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

-तुमच्याही बुडाखाली किती अंधार आहे ते बघा; मुख्यमंत्र्यांचा भाजपवर पलटवार

-कोणतीही चौकशी करा… मी घाबरत नाही- देवेंद्र फडणवीस

-त्यांच्यातच संवाद नाही… ते आमच्याशी काय संवाद साधणार??- देवेंद्र फडणवीस