मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात मारले दोन पक्षी, राष्ट्रवादीच्या इच्छेनुसार मुख्य सचिवांची बदली तर….

मुंबई | संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर संजय कुमार सूत्रे स्वीकारतील. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे.

अजोय मेहता यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन थेट राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागली होती. अजोय मेहता यांना यापूर्वी मुदतवाढ मिळाली होती. मात्र, आता त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळालेली नाहीये.

संजय कुमार हे ते मूळचे बिहारचे असून त्यांना प्रशासकीय सेवेचा दीर्घ अनुभव आहे. संजय कुमार हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. म्हणजेच संजय कुमार हे अजोय मेहतांच्याच बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

दरम्यान, अजोय मेहता यांना मुदतवाढ मिळाली नाहीये मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचं पद दिलं आहे. अजोय मेहता यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली आहे.

 

-शरद पवारांच्या पायाच्या धुळीची तरी लायकी आहे का त्या पडळकरची- जितेंद्र आव्हाड

-शरद पवारांच्या पायाच्या धुळीची तरी लायकी आहे का त्या पडळकरची- जितेंद्र आव्हाड