भामट्या, स्वत:च्या उंचीत राहून बोल…. शशिकांत शिंदे भडकले

मुंबई |   भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल शरद पवार यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. माजी मंत्री आणि नुकतीच विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार शशिकांत शिंदे यांनी पडळकर यांचा जोरदार समाचार घेतला आहे.

आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल बोलताना भामट्याने स्वतःच्या उंचीत रहावे.. आमच्या नेत्याने गेली 50 वर्षे देशाच्या व राज्याच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले, हे त्या भामट्याने लक्षात ठेवावे, असं शशिकांत शिंदे म्हणाले आहेत.

आपण महान नेत्यावर बोलताना काय बोलतो… कसं बोलतो, याची काळजी घेतली पाहिजे आणि विचार करून बोललं पाहिजे. आमच्या नेत्यावर केलेल्या ह्या टीकेचा मी जाहीर निषेध करतो, असं शिंदे म्हणाले.

दरम्यान, पडळकर यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज राष्ट्रवादीकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस आज राज्यातल्या विविध शहरांत पडळकर यांचा निषेध व्यक्त करणार आहे.

 

-शरद पवारांच्या पायाच्या धुळीची तरी लायकी आहे का त्या पडळकरची- जितेंद्र आव्हाड

-“फडणवीसांना आणि त्यांच्या पत्नीला घाणेरड्या शिव्या देणारे आज का बरं चवताळले आहेत?”