लहान मुले केव्हा काय मागतील केव्हा कशाचा हट्ट पकडतील याचा काही नेम नाही. हट्ट पुर्ण होईपर्यंत ते आईवडिलांना पार रडकुंडीला आणल्या शिवाय राहत नाही. यातच एका चिमुरडीनं एक अनोखाच हट्ट पकडलेला दिसतोय. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
सहसा लहान मुलं खाऊसाठी, खेळण्यासाठी हट्ट करताना दिसतात. मात्र ही चिमुकली चक्क नवऱ्यासाठी हट्ट करताना दिसली आहे. हा हट्ट करताना ती ढसाढसा रडताना दिसत आहे. हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालादेखील हसू आल्याशिवाय राहणार आहे.
व्हिडीओत छोटी चिमुरडी आपल्या आई आणि आजीकडे मला माझ्या नवऱ्याकडे जायचं आहे अशी विनवणी करत आहे. व्हिडीओत पाहू शकता ती जमिनीवर निराश बसून रडताना दिसत आहे. तेव्हा तिची आई तिला विचारते कोण आहे तुझा नवरा तेव्हा ती मामा असं म्हणते. तिची आई तिला सांगते मामा तर मामीचा नवरा आहे. यावर ती चिमुकली माझा पती कोण आहे? असं रडतरडत विचारत आहे. तिच्या या रडण्यावर आजूबाजूला बसलेले हसायला लागतात. यावरुन ती चिमुकली पुन्हा आरडाओरड करत रडायला लागते.
तिला समजवताना एक महिला म्हणते की, ‘लहान मुलांचे पती नसतात. लहाण मुलं जेव्हा मोठे होतात तेव्हा त्यांचे पती होतात. लहाण मुलांचे तर भाऊ-बहीण असतात’, अशी महिला मुलीला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तिला समजून सांगितल्या नंतरही ती रडताना दिसत आहे.
चिमुरडीचा हा गोड व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर हास्येची लहर फुटलेली पहायला मिळावी. हा गोड व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत एका यूजरनं कॅप्शन देत म्हटलं की, ‘मुलं पण ना.. कोण समजवणार यांना…’,.
ये बच्चे भी ना… कौन समझाए इनको…@ipsvijrk @ipskabra @Chhattisgarh_36 pic.twitter.com/ssrMxR81rY
— Vijay kumar (@vkvkmarwat) February 11, 2021
महत्वाच्या बातम्या –
‘माझी बहिण वाघिण होती पण…’; पूजा चव्हाणच्या बहिणीची भावूक पोस्ट व्हायरल
धक्कादायक ! ‘या’ कारणामुळे त्याने सांडपाण्याच्या नळीत लपवलं 21 लाखांचे सोनं!
पूजा चव्हाण प्रकरण: मुसक्या आवळायच्या तर वाट कसली बघताय?- चित्रा वाघ
जाणून घ्या शरीरासाठी गुणकारी असणाऱ्या काळ्या तांदळाविषयी, ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे