Corona Virus | चीनने पुन्हा जगाचं टेंशन वाढवलं, धडकी भरवणारी बातमी समोर

बीजिंग | चीनमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 5,280 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यापैकी 3,507 घरगुती प्रकरणे आहेत. वुहानमध्ये साथीच्या रोगाचा उद्रेक झाल्यानंतर ही दुसरी सर्वाधिक प्रकरणे आहेत.

वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर चीनमधील 13 शहरे आणि काउंटीमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

व्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकाराचा नवीन प्रकार देशात पसरला आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सुमारे 5 कोटी चीनी नागरिक त्यांच्या घरात कैद झाले आहेत.

सध्याच्या काळात जिलिन प्रांतात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. याशिवाय चीनचे तांत्रिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेनझेन प्रांतातही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. शांघायमधील दोन आणि शेन्झेनमधील एक रुग्णालये 12 मार्चपूर्वी बांधण्यात आली आहेत.

उत्तर कोरियाच्या सीमेवर वसलेल्या जिलिन प्रांतातील लोकांवर, प्रांतात आणि आसपास प्रवास बंदी लादण्यात आली होती.

जिलिनच्या राज्यपालांनी सोमवारी रात्री तातडीच्या बैठकीत एका आठवड्यात शून्य कोविडचे लक्ष्य ठेवलेत.

महत्वाच्या बातम्या- 

चंद्रकांत पाटलांचा नवा खळबळजनक दावा; राजकारणात मोठी उलथापालथ होणार? 

Russia-Ukraine War: मोठी बातमी! रशियाकडे आता फक्त 14 दिवसांचा… 

महाराष्ट्राचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन! 

“ज्यांना वाटतं की ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट योग्य नाही त्यांनी…” 

मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी; ही महत्त्वाची माहिती आली समोर