चाकणकर ही बावळट बाई; चित्रा वाघ यांना संताप अनावर

मुंबई |  हिंगणघाट पीडितेच्या उपचाराच्या खर्चावरून महिला भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. रूपाली चाकणकर यांनी केलेली टीका चित्रा वाघ यांच्या चांगलीच जिव्हारी लागलीये. त्यांनी आपला संताप व्यक्त करताना चाकणकर ही बावळट बाई आहे, असं म्हटलंय.

वर्ध्यातल्या हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला जिवंत जाळून हत्या करण्याचा प्रयत्न झाला. घडलेल्या प्रकाराने महाराष्ट्र सुन्न झालाय. तसंच आरोपीविरोधात महाराष्ट्रभरात संतापाची लाट आहे.  मात्र, याच प्रकरणावरुन रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे.

पीडित तरुणीला सरकार मदत करत नसल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. यावर चित्रा वाघ कायम सत्ताधाऱ्यांवर  तुम्हाला टिका करावी लागतेय तुम्हाला… जिकडे जाता तिकडे सत्तेतून पायउतार व्हावे लागतंय……..पायगुणच…. विरोधक म्हणून शुभेच्छा पण अशा ठिकाणी राजकारण करू नका जिथे माणसाच्या जगण्याचा संघर्ष चालू असतो आणि सारा महाराष्ट्र त्यासाठी प्रार्थना करतोय आणि आपण राजकारण करताय, अशा शब्दात चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना लक्ष्य केलंय.

दुसरीकडे पीडित तरूणी मृत्यूशी झुंज देत असताना राजकीय पक्षाच्या नेत्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत, यावरून सर्वसामान्य नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-“चित्रा वाघ, तुमचा पायगुणच…. जिकडं जाता तिकडं सत्तेवरून पायउतार व्हावं लागतंय”

-बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या; मोदींच्या जवळच्या मित्राची मागणी

-आदित्य ठाकरेंनी नाईट लाईफवर खूप मेहनत घेतलीये- दिशा पटानी

-आदित्य सारखा तरूण नेता महाराष्ट्राला मिळाला ही खूप मोठी गोष्ट; दिशा पटानीची स्तुतीसुमनं

-सोशल मीडियावर डॉ. अमोल कोल्हे ट्रोल; ट्वीट करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर!