केजरीवालांचा ‘झाडू’ पुन्हा भाजपचा सुफडासाफ करणार; सर्व्हेचा अंदाज

नवी दिल्ली |  दिल्ली विधानसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. दोन दिवसांत प्रचाराचा धुराळ शांत होणार आहे. 8 तारखेला दिल्ली विधानसभेसाठीचं मदतान पार पडेल. याअगोदर ‘एबीपी न्यूज आणि सी व्होटर’ने दिल्लीकर जनतेच्या मनातील कौल जाणून घेतला आहे. या सर्व्हेमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा ‘झाडू’ पुन्हा एकदा भाजपचा सुफडासाफ करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

‘एबीपी आणि सी व्होटर’च्या सर्व्हेनुसार आम आदमी पक्षाला कमीत कमी 42 तर जास्तीत जास्त 56 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजपला कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 24 जागा मिळू शकतात, असा अंदाज लावण्यात आला आहे.

दुसरीकडे दिल्लीत काँग्रेसची पार धुळधाण होणार असल्याचं भाकित सर्व्हेने वर्तवलं आहे.  काँग्रेसला 0 ते 4 जागा मिळू शकतात, असं सर्व्हेने म्हटलं आहे. काँग्रेससाठी ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, 2015 च्या निवडणुकीत आपला 70 पैकी 67 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला 3 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. काँग्रेसला तर खातही उघडता आलं नव्हतं. आता दिल्लीकर नागरिक कुणाला सेवेची संधी देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-चाकणकर ही बावळट बाई; चित्रा वाघ यांना संताप अनावर

-“चित्रा वाघ, तुमचा पायगुणच…. जिकडं जाता तिकडं सत्तेवरून पायउतार व्हावं लागतंय”

-बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या; मोदींच्या जवळच्या मित्राची मागणी

-आदित्य ठाकरेंनी नाईट लाईफवर खूप मेहनत घेतलीये- दिशा पटानी

-आदित्य सारखा तरूण नेता महाराष्ट्राला मिळाला ही खूप मोठी गोष्ट; दिशा पटानीची स्तुतीसुमनं