Top news महाराष्ट्र मुंबई

‘तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला’; चित्रा वाघ यांचं मलिकांना प्रत्युत्तर

Photo Credit- Facebook/ Nawab Malik and Chitra Wagh

मुंबई | आर्यन खान ड्रग्सप्रकरणी मंत्री नवाब मलिक एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर वारंवार आरोप करत आहे. नुकतंच याला समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी प्रत्युत्तर दिलं. तसेच या प्रकरणावरून भाजपही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याप्रकरणीवर भाष्य करत नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट करत नवाब मलिकांवर सडकून टीका केली आहे.

तुम्ही त्याला धमक्या दिल्या, त्याला अपमानीत, केलं त्याच्या पत्नीला शिव्या दिल्या, त्याच्या बहिणीवर आरोप केले, त्याच्या आई वडिलांना बदनाम केलं, त्याचा जात धऱ्म काढला तरीही तो गडमगला नाही. तो कर्तव्य बजावत राहिला. तुम्ही करा रे कितीही हल्ला लय मजबूत भिमाचा किल्ला, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विटरवर आपला एक व्हिडीओ पोस्ट करुन मी क्रांती रेडकर सोबत असल्याचं जाहीर केलंय आहेय आर्यन खानच्या पाठीशी बॉलिवूडसह सरकार उभं राहिलं, तर जीव धोक्यात घालणाऱ्या समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्यावर अभद्र भाषेत टीका सुरू आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच मी महिला म्हणून अभिनेत्री क्रांती रेडकरसोबत आहे, असं चित्रा वाघ यांनी याआधी म्हटलं आहे.

दरम्यान, क्रांती रेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी पहिल्यांदा भाष्य केलं. आजच्या महिला पुढारलेल्या आहेत पण नवाब मलिक बायकांच्या चोमडेपणासारखे आरोप करतायेत, अशा शब्दात क्रांती रेडकर यांनी नवबा मलिक यांना सुनावलं आहे. तसेच माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकावर विश्वास असून उद्धव ठाकरे हे सत्याचीच बाजू घेतील, असं क्रांती रेडकर म्हणाल्यात.

महत्वाच्या बातम्या-

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचा दर

“नवाब मलिकांचं दुःख वेगळं आहे, ते स्पष्टपणे समोर येतय”

“शिवसेनेचा इतिहास पाहा, नाव महाराजांचं घेतील पण काम मुघलांचं करतील”

माझा उद्धव ठाकरेंवर पूर्ण विश्वास, ते सत्याचीच बाजू घेतील- क्रांती रेडकर

“संजय राऊत इंटरव्हलनंतर बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार”