पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचा दर

मुंबई | कोरोना संसर्ग रोगाने सगळीकडे थैमान घातलं होत. जवळजवळ त्याला आता दोन वर्ष होतील. त्याकाळात सरकारने लॉकडाऊनही जाहीर केलं होतं. परंतू लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमतीही वाढल्या असल्याचं पाहायला मिळलं होतं.

यामध्ये पेट्रोल-डिझेलचाही समावेश झाला होता. महत्वाची बाब म्हणजे अजूनही या किंमती वाढतच चालल्या आहेत. मागिल काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ झालेली पाहायला मिळतं आहे.

सोमवार म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनूसार, पेट्रोल-डिझेलच्या किंमती ज्या होत्या त्याच आज मंगळवार म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी त्यामध्ये कोणतेच बदल झाले नव्हते. परंतू आता त्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.

त्यामुळे मुंबईमध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर दर 113.80 रूपये इतका आहे. तर डिझेल प्रती लिटर 104.75 रूपये आहे. तसेच दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लीटर 107.94 रूपये आहे आणि डिझेलचा दर 96.67 रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या-

“नवाब मलिकांचं दुःख वेगळं आहे, ते स्पष्टपणे समोर येतय”

“शिवसेनेचा इतिहास पाहा, नाव महाराजांचं घेतील पण काम मुघलांचं करतील”

माझा उद्धव ठाकरेंवर पूर्ण विश्वास, ते सत्याचीच बाजू घेतील- क्रांती रेडकर

“संजय राऊत इंटरव्हलनंतर बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार”

“आजच्या महिला पुढारलेल्या पण नवाब मलिकांचे आरोप बायकांच्या चोमडेपणासारखे”