“नाना पटोलेंच्या वक्तव्यावर राहुल गांधी गप्प का?”

मुंबई | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं राज्यात मोठा गोंधळ निर्माणा झाला आहे. अशाता आता या प्रकरणात भाजप आणि काॅंग्रेसमध्ये जोरदार जुंपली आहे.

काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये काही विकास कामांचा आढावा घेण्यासाठी नरेंद्र मोदी हे पंजाबच्या दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांच्या सुरक्षेत मोठी चुक झाली होती. त्यानंतर देशात मोठा गोंधळ झाला होता.

भाजपनं आता नाना पटोले यांच्या मी मोदींना मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो या वक्तव्याचा संदर्भ पंजाबमधील घटनेशी जोडायला सुरूवात केली आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्यावर राहुल गांधी गप्प का?, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

पंजाबमध्ये अपुर्ण राहिलेला कट महाराष्ट्रात शिजतोय का?, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांना केला आहे. परिणामी राज्यातील गोंधळ आता दिल्लीत गेला आहे.

चित्रा वाघ यांनी थेट राहुल गांधीना सवाल केल्यानं आता हा वाद वाढण्याची शक्यता आहे. आमचा ठाकरे सरकारच्या पोलिसांवर विश्वास नाही परिणामी या प्रकरणांचा तपास हा केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात आला पाहीजे, असंही त्या म्हणाल्या आहेत.

नाना पटोले यांनी मोदींबद्दल वक्तव्य केल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात सरकारविरोधात आंदोलन करण्यात आली आहेत. आंदोलन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर वाघ यांनी सरकारवर टीका केली आहे.

नाना पटोले यांनी बोलण्याच्या ओघात ते वक्तव्य केलं नसून मुद्दाम केलं असल्याची टीका भाजपनं केली आहे. राज्यातील भाजपन या प्रकरणावर राज्यपालांची भेट घेतल्यानं  आता या वादात राज्यापाल उडी घेतात का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

दरम्यान, भाजपनं नाना पटोले यांच्या अटकेची मागणी केली आहे. अशात आता महाविकास आघाडी सरकार काय भूमिका घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…कुछ नन्हें पटोले”; अमृता फडणवीसांची पटोलेंवर शायराना अंदाजात टीका

“नानांनी तर हद्दच केली, मालकिणीचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा दाखवण्यासाठी…”

“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं” 

“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?” 

‘इतना झूठ तो टेलिप्रॉम्प्टर भी सह न सका’; राहुल गांधींचा मोदींना टोला