“मूर्ख लोकं लग्न करतात आणि स्मार्ट लोकं…”; राम गोपाल वर्मांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

मुंबई | घटस्फोटाची अनेक प्रकरण दररोज घडत असतात. पण काही प्रकरणं प्रचंड गाजतात सध्या दाक्षिणात्य अभिनेता धनुषनं आपल्या पत्नीसोबत घटस्फोट जाहीर केला आहे.

दाक्षिणात्य आणि बाॅलिवूड दोन्ही सिनेमा क्षेेत्रात धनुषच्या अभिनयाला चाहत्यांनी पसंत केलं आहे. अनेक चित्रपटांसाठी धुनषला पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतनं आपल्या 18 वर्षाचा नात्याला आता ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी ही जोडी सध्या प्रचंड चर्चेत आहे. अशात या निर्णयावर काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

दाक्षिणात्या सिनेमा क्षेत्रातील प्रतिष्ठित दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी या घटस्फोटानंतर आपली वेगळीच मांडणी केली आहे. परिणामी आता राम गोपाल वर्मा यांच्या वक्तव्यांची चर्चा होताना दिसत आहे.

घटस्फोटचा जल्लोष साजरा केला पाहीजे. घटस्फोट झाल्यावर गाणी लावून आपण त्या क्षणांचा आनंद व्यक्त केला पाहीजे. कारण तुम्ही एका बंधनातून मुक्त होत असता, असं राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं आहे. तसंच स्मार्ट लोकं प्रेम करतात, मुर्ख लोकचं लग्न करतात, असंही ते म्हणाले आहेत.

लग्न म्हणजे एकमेकांची चांगले आणि वाईट गुण तपासण्याची संधी असते. परिणामी लग्न गपचूप केलं पाहीजे, असं वक्तव्य राम गोपाल वर्मा यांनी केल्यानं सध्या वर्मा चर्चेत आहेत.

लग्न एक वाईट रितीरिवाज आहे जो आपल्या पुर्वजांनी आपल्यावर थोपवला आहे. दु:ख आणि सुखाच्या चिरंतन चक्राला चालवण्यासाठी त्यांनी हे केलं आहे, असं राम गोपाल वर्मा म्हणाले आहेत.

दरम्यान, राम गोपाल वर्मा यांच्या या वक्तव्यांवर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. त्यांनी हे वक्तव्य धनुषचा घटस्फोट झाल्यानंतर केलं आहे हे विशेष.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…कुछ नन्हें पटोले”; अमृता फडणवीसांची पटोलेंवर शायराना अंदाजात टीका

“नानांनी तर हद्दच केली, मालकिणीचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा दाखवण्यासाठी…”

“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं” 

“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?” 

‘इतना झूठ तो टेलिप्रॉम्प्टर भी सह न सका’; राहुल गांधींचा मोदींना टोला