कोल्हापूर | कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकात जाधव यांचं निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक लागली असून जयश्री जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली आहे.
सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी या ठिकाणी तळ ठोकला आहे.
कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी चित्रा वाघ या भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ आल्या आहेत. यावेळी त्यांनी सतेज पाटलांवर निशाणा साधला.
माझ्या नवऱ्याची एक भानगड बाहेर काढून दाखवा, मी तुमचे व्हॉल्यूम काढेन असं जाहीर आव्हान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मंत्री सतेज पाटील यांना दिलं आहे.
नाशिकच्या वाघांच्या अनेक भानगडी आहेत असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी वक्तव्य केल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलं. त्यावर वाघांची एक भानगड काढून दाखवा, तुमच्या भानगडींचे व्हॉल्यूम निघतील असं चित्रा वाघ या म्हणाल्या.
निवडणूक आहे, विकासावर बोला. माझ्या नवऱ्याची एकही भानगड काढून दाखवा मी तुमच्या भानगडींचे व्हॉल्यूम काढून दाखवेन. आता बोलणार नाही, वेळ आली तर करुन दाखवेन. मी एक बाई आहे म्हणून दुसऱ्या बाईबद्दल म्हणजे तुमच्या बायकोबद्दल बोलणार नाही, असंही त्या म्हणाल्यात.
महत्त्वाच्या बातम्या-
Corona: महाराष्ट्र कोरोनामुक्त होतोय! वाचा राज्याची आजची ताजी आकडेवारी
Amit Shah: “…तेव्हा मला राग येतो”, गृहमंत्री अमित शहांचा संसदेत खुलासा
“राज ठाकरेंंना माझी हात जोडून विनंती आहे की…”
कोरोनाच्या चौथ्या लाटेबद्दल अदर पुनावाला यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेच्या मुस्लीम कार्यकर्त्यांचे राजीनामे