ख्रिस गेलने टी-20 मध्ये चौकार आणि षटकार मारून रचला ‘हा’ नवा विक्रम!

नवी दिल्ली | क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहे, ज्यांनी स्वतःला वेळोवेळी सिद्ध केलं आहे. पण तुम्हाला आता अशा एका खेळाडूविषयी सांगणार आहोत जो मैदानात खेळायला उतरला की, त्याचा खेळ पाहण्यासाठी सर्व आतुर असतात.

ज्यांला टी-20 चा बॉस म्हणून ओळखलं जातं. त्या खेळाडूच नाव आहे ख्रिस गेल. ख्रिस गेल यांना फटकेबाजी करणारा खेळाडूही बोलले जाते. त्यांचे आकडेच ही गोष्ट सिद्ध करतात की, यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली आहे.

क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा खेळ खेळणारा ख्रिस गेल शिवाय अजून कोणताच खेळाडू नाही. 41 वर्षीय ख्रिस गेल जगभरातील टी-20 सामने खेळतात. सध्या ते आयपीएलच्या 13व्या पर्वात ते किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळत आहेत.

ख्रिस गेल यांनी टी-20 क्रिकेटमध्ये आता एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. खरंतर अशा विक्रमाचा विचार करणेच हीच आश्चर्याची गोष्ट आहे. पण ख्रिस गेल यांनी ते करून दाखवले आहे, ते उत्तम फलंदाजाबरोबरच एक शानदार एंटरटेनरही आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये 10000 धावा पूर्ण करणारे ख्रिस गेल हे जगातील पहिले फलंदाज ठरले आहे. पण आता त्यांच्या धावा 13349 पर्यंत जाऊन पोहोचल्या आहे. यातच त्यांनी एक अजून आश्चर्यकारक गोष्ट केली आहे. ती म्हणजे ख्रिस गेल यांनी चौकार आणि षटकार मारून 10000 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

ख्रिस गेल हे जगातील पहिले असे खेळाडू आहे, ज्यांनी फक्त चौकार आणि षटकार मारून टी-20 क्रिकेटमध्ये 10000 धावा केल्या आहेत. आतापर्यंत ख्रिस गेल यांनी 405 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्यांनी 983 षटकार आणि 1027 चौकार मारले आहे.

फक्त षटकारांच्याच धावा 5898 होतात आणि चौकारांच्या धावा 4108 धावा होतात. या दोन्हींची बेरीज केली तर 10006 होते. म्हणजे 13349 धावांपैकी 10006 धावा फक्त चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून केल्या आहे. उरलेल्या 3343 धावा एक, दोन आणि तीन धावा करून काढल्या आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 10000 धावा फक्त चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून करणे खूपच अवघड आहे.

आतापर्यंत ख्रिस गेलशिवाय अन्य कोणालाही ते करायला जमलं नाही. ख्रिस गेल यांनी आतापर्यंत एका डावात नाबाद 175 धावा केल्या आहे. ख्रिस गेल यांनी 22 शतक आणि 83 अर्धशतक केले आहे. ख्रिस गेल यांच्या व्यतिरिक्त 10000 धावा पूर्ण करणारे पाकिस्तानचे शोएब मलिक आणि वेस्ट इंडिजचे किरण पोलार्ड हे दोन खेळाडू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ ठिकाणी रोज 2 तास मिळते केवळ एक रुपयात पोटभर जेवण!

उपमुख्यमंत्री अजित पवार ‘त्या’ प्रकरणी अडकणार? ईडीची मोठी कारवाई

अखेर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या मुहूर्तावर सोडलं मौन म्हणाले…

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! आता सुशांतचा मित्र संदीप सिंहनं उचललं ‘हे’ पाऊल

आता भाजपचा ‘हा’ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर? राजकीय चर्चेला उधाण