चार एकरात लावली होती कोथिंबीर; मिळालं 12 लाख 51 हजार रुपयांचं विक्रमी उत्पन्न

नांदूरशिंगोटे | कोरोनाकाळात सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे या गावातील एका शेतकऱ्याच्या मेहनतीला चांगलाच दाम मिळाला आहे. नांदूरशिंगोटे गावातील शेतकरी विनायक हेमाडे यांनी कोरोनाकाळात 4 एकर क्षेत्रात कोथिंबिरीचं बी पेरलं.

यानंतर हेमाडे यांनी कोथिंबिरीच्या वाढीसाठी चांगली मेहनत घेतली. हेमाडे यांच्या कुटुंबानंही विनायक हेमाडे यांच्या खांद्याला खांदा लावून पिकाच्या वाढीसाठी कष्ट केलं. काही दिवसांतच हेमाडे कुटुंबाच्या मेहनतीला फळ मिळालं.

41 दिवसांमध्ये हेमाडे यांची कोथिंबीर चांगलीच बहरली. दापूर येथील व्यापारी शिवाजी दराडे यांची हेमाडे यांच्या कोथिंबिरीवर नजर पडली. हेमाडे यांच्या 4 एकरात बहरलेल्या कोथिंबीरिला दराडे यांनी मागणी केली.

शेतकरी विनायक हेमाडे आणि व्यापारी शिवाजी दराडे यांच्यात 12 लाख 51 हजार रुपयांना कोथिंबिरीचा हा व्यवहार निश्चित झाला. त्यानंतर हेमाडे यांनी आपली कोथिंबीर दराडे यांना दिली.

विनायक हेमाडे यांच्या कोथिंबिरीला भरघोस उत्पन्न मिळाल्यानं नांदूरशिंगोटे परिसरात हेमाडे यांचीच चर्चा रंगली आहे. परिसरातील शेतकऱ्यांना हेमाडे यांच्या कोथिंबिरीला मिळालेल्या भावामुळे शेती करण्यास आणखी प्रोत्साहन मिळालं आहे.

विनायक हेमाडे यांनी कोथिंबिरीसाठी कोणत्याही बाजारभावाची अपेक्षा न करता कोथिंबीर पिकाची लागवड केली होती. मात्र, आता कोथिंबिरीला अपेक्षेपेक्षा जास्त मिळालेल्या उत्पन्नामुळे हेमाडे यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतला ही गोष्ट देण्यात आली होती?; एम्सच्या मेडिकल टीमला संशय

पोरीनं बाप गमावला, मात्र महाराष्ट्राच्या आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा व्हिडीओ बनवला!

काय सांगता! ‘या’ चित्रपटासाठी सुशांतनं घेतलं होतं फक्त 21 रुपये मानधन!

रियाची कसून चौकशी सुरु!; NCBनं रियाला विचारले ‘हे’ 22 महत्त्वाचे प्रश्न

माझ्या मुलांसाठीही मी तुझ्यासारखं होऊ इच्छिते; अंकितानं कुणासाठी शेअर केली ही पोस्ट?