सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ प्रश्नाचं मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर; म्हणाले…!

मुंबई : लोक आमच्याकडे असले की गुंड आणि भाजपकडे गेले की लगेच स्वच्छ तांदळासारखे धुतले जातात. भाजपकडे असं कोणतं वॉशिंग पावडर आहे?, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लगावला होता. त्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. 

भाजप वॉशिंग पावडर वगैरे वापरत नाही तर आमच्याकडे विकासाचं डॅशिंग रसायन आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. 

आमच्याकडे असणाऱ्या रसायनामुळे आमचे विरोधक निशप्रभ आहेत. आमच्याकडे मोदींसारखा नेता आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

मी सु्प्रिया सुळेंचं आभार मानतो कारण त्यांनी मान्य केलंय त्यांच्या पक्षात खूपच भ्रष्टाचार आणि घाण झाली आहे. त्यांना वॉशिंग पावडरची आवश्यकता आहे, असं सुनावताना मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनी पक्षांतर केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या-