अरूण जेटलींच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद भावूक

नवी दिल्ली : देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते अरूण जेटली यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं आहे. यावर देशाचे राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे.

जेटलींनी धैर्य सन्मानाने दीर्घ आजाराशी झुंज दिली. जेटली हे अत्यंत हुशार वकील होते. अनुभवी संसद सदस्य आणि एक प्रतिष्ठित मंत्री म्हणून त्यांनी राष्ट्र उभारणीत मोठे योगदान दिले, असं रामनाथ कोविंद म्हणाले आहेत.

अरुण जेटली यांच्या निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जेटलींच्या निधनानंतर देशातील राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

जेटलींना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महत्वाच्या बातम्या-