“नैतीक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा”

मुंबई |   प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फो.टके सापडल्याप्रकरणी एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अ.टक करण्यात आली. यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये चांगलीच आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे.

मनसुख हिरेन मृ.त्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका सं.शयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या र.डारवर होते. त्यांच्या अ.टकेनंतर भाजप नेते जास्तच आक्रमक झाले असल्याचं दिसतं आहे.

सचिन वाझे यांच्या प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते सरकारला कोडींत धरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच भाजपचे नेते नारायण राणे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ह.ल्लाबोल केला आहे.

माझ्या मते सचिन वाझे यांचा पुर्वोतिहास पाहता त्यांना पोलिस खात्यात परत घेणं. तसेच मनसुथ हिरेण आणि अन्य हत्या. या सर्वांना जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टी.कास्त्र सोडलं आहे.

याच पार्श्वभूमीवर नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्री उद्धव यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.

या संदर्भात राणे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी सचिन वाझे यांना निलंबित असताना खात्यात घेणे, क्राईममध्ये पोस्टिंग देणे, त्यांना प्रत्येक वेळी संरक्षण देणे, वाझे यांच्यावर का.रवाई करण्यात विलंब लावणे, विरोधी पक्षाच्या दबावामुळे वाझे यांच्यावर का.रवाई करणे त्यातच मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली, या सगळ्या गोष्टींना मुख्यमंत्री जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच, सचिन वाझे प्रकरणात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकरावर आणखी एक आ.रोप केला आहे. सचिन वाझे, परमबीर सिंह ही छोटी माणसे आहेत. त्यांच्या मागचे हात शोधा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, सचिन वाझे प्रकरणासंबंधी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ठाकरे सरकारला सल्ला दिला आहे. सचिन वाझे, मनसुख हिरेन आणि मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी ह.ल्लाची आणखी हे सर्व मुद्दे एकमेकांशी जोडले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारने NIA ला तपास करण्यात सहकार्य करावं, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-