दुबईतील ‘या’ बॅंंकर सोबत मौनी रॉय अडकणार लग्न बंधनात?

मुंबई| या नवीन वर्षात कलाकारांसोबत अनेक खेळाडू सुद्धा लग्नबंधनात अडकलेले पहायला मिळाले. त्यातच यावर्षी आणखी एका सेलिब्रिटीचे लग्न होण्याचे संकेत दिसत आहे. नागीन या हिंदी मालिकेतील शिवन्या म्हणजेच अभिनेञी मौनी रॉय यावर्षी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

टेलिव्हिजन सोबतच चिञपटातही आपल्या ग्लॅमरस अदांनी घा.याळ करणारी अभिनेञी मौनी रॉय गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल खूप चर्चेत आहे. बऱ्याच काळापासून मौनी दुबईतील स्थाईक बॅंकर सूरज नंबियार याला डेट करत होती. परंतु आता लवकरचं हे दोघं लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे.

नुकत्याच समोर आलेल्या माहिती नुसार, मौनी रॉय आणि तिची आई सूरज नंबियारच्या कुटुंबाला भेटली. त्यावेळी त्यांनी सूरज आणि मौनीच्या लग्नाविषयी बोलणी केली. मंदिरा बेदी ही मौनीची जवळची मैञिण असून, तिच्या घरी मौनीचं कुटुंब आणि सुरजच्या कुटुंबामध्ये लग्नाची बोलणी झाल्याच कळतंय. बोलणीच्या वेळी मंदिराचा भाऊ देखील उपस्थित होता. त्याचवेळी दोघांच्या लग्नाची तारीख ठरवण्यात आली.

काही दिवसांपूर्वी मौनीनं तिच्या इंन्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. त्यामध्ये सूरज आणि त्याची संपूर्ण कुटुंब असून तिने कुटुंबासोबत फोटो पोस्ट केले होते. या फोटोमध्ये तिने सूरजच्या आई-वडिलांनसमवेत ‘मॉम आणि डॅड’ असं लिहिलं होतं.

यापूर्वी मौनी आणि मोहित रैनासोबत रिलेशनशिपमध्ये होती. तसेच त्यांच्या रिलेशनशिपबद्दल बरीच चर्चा चालू असायची. माञ काही कारणास्तव त्या दोघांचं ब्रेकअप झालं. परंतु गेल्या काही दिवसांपासून मौनी रॉय आणि सूरज नंबियार यांच्या रिलेशनशिपबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे.

सूरज हा दुबईमध्ये स्थाईक असून, बॅंकींग क्षेञात कार्यरत आहे. लॉकडाऊनच्या काळात मौनी तिच्या कुटुंबियांसमवेत दुबईत तिच्या बहिणीकडे होती. त्या दरम्यान तिची वारंवार सूरज सोबत भेट होत राहिली. मौनीने दुबईमध्ये सूरजच्या कुटुंबासोबत नवीन वर्षातं सेलिब्रेशन केलं होत. तसेच त्यावेळी तिने अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेपासून मौनीने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर तिने अनेक मालिकेंमध्ये काम केले. पार्वतीची भूमिका असलेल्या ‘देवों के देव महादेव’ या मालिकेत ती प्रेक्षकांना चांगलीच भावली. अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चिञपटामधून तिनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केल. ‘मेड इन चायना’ या चिञपटात तिची रुक्मिनीची भूमिका प्रेक्षकांना सर्वाधिक पसंत आली.

तसेच मौनीचं ‘केजीएफ’ या हिंदी डबमधील आयटम सॉंग चांगलचं गाजलं. लवकरचं मौनी आता ‘ब्रम्हास्ञ’ चिञपटामध्ये एका मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या! दररोज बीट खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी…

महादेव जाणकरांचा बारामतीबद्दल पवारांना ईशारा, म्हणाले…

पॅराग्लायडींग करण्याचं धाडस केलं, पण चांगलंच अंगलट आलं;…

तुझ्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडनं किस केलं तर??? शाहरुखच्या…

हिरेन प्रकरणातील ती मर्सिडीज भाजप नेत्याची? सचिन सावंत यांचा…