रायगडच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताच मुख्यमंत्र्यांची लगोलग 100 कोटींची घोषणा

रायगड |  निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले, मात्र चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे राहावेच लागेल, यासाठी रायगड जिल्ह्याला तातडीची मदत म्हणून शासनाकडून शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. तत्पूर्वी आज सकाळी मुख्यमंत्र्यांचे मुंबईहून बोटीने मांडवा येथे आगमन झाले. त्यानंतर  त्यांनी थळ येथे भेट देऊन पाहणी केली.

यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, नगरविकास, आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, खासदार सुनील तटकरे उपस्थित होते.

सर्वात जास्त नुकसान विजेच्या खाबांचे  झाले आहे. घरांची पडझड झाली आहे. झाडांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टी पुन्हा सुरळीत होण्यासाठी अधिक तांत्रिक मनुष्यबळाची गरज लागणार आहे. यासाठी शासन स्तरावरून मदत निश्चित केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

याबरोबरच ज्या नागरिकांचा  या वादळामुळे अन्नधान्याचा आणि जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, शासन त्यांच्या अन्नधान्याचा,  जेवणाचा प्रश्न निश्चितच सोडविणार. जनतेच्या पाठीशी हे शासन खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या बातम्या-

-“फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हाच कौल होता, मात्र सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला”

-पर्यावरण दिनानिमित्त राज्यपालांनी केलं राजभवन येथे वृक्षारोपण

-…म्हणून भाजपच्या ‘या’ महिला आमदाराविरोधात गुन्हा दाखल

-…अन्यथा शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होणार; राज्य सरकारचा नवा आदेश

-योगी आदित्यनाथांच्या वाढदिवसाला संजय राऊतांनी दिल्या अनोख्या शुभेच्छा