अमेरिकेनंतर आता ‘हा’ देश ठरतोय कोरोनाचं नवं हॉटस्पॉट; अक्षरशः थैमान सुरु

मुंबई | जगभरात कोरोना विषाणूचं थैमान अजूनही सुरुच आहे. जगभरात दररोज सुमारे लाखबर नवीन रुग्ण सापडत आहेत. चीननंतर इटली आणि इटलीनंतर अमेरिकेत कोरोनाचा प्रभाव वाढलेला असताना आता ब्राझीलमध्ये देखील कोरोनाचं थैमान सुरु आहे.

ब्राझीलमध्ये गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे १४७३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आजपर्यंत एकूण ३४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदराच्या आकडेवारीबाबत इटलीला देखील मागे टाकले आहे.

अमेरिका अजूनही कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या आकडेवारीत पुढे आहे. येथे एक लाखाहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सुमारे ४० हजार लोकांचा मृत्यू झालेला यूके दुसर्‍या क्रमांकावर आहे.

ब्राझीलमध्ये धक्कादायक बाब म्हणजे इथं केलेल्या चाचण्यांमध्ये सुमारे ६० टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत ब्राझीलमध्ये ९.२५ लाख चाचण्या झाल्या आहेत, तर रुग्णांची संख्या ६ लाखांच्या वर गेली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-रायगडच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताच मुख्यमंत्र्यांची लगोलग 100 कोटींची घोषणा

-“फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हाच कौल होता, मात्र सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला”

-पर्यावरण दिनानिमित्त राज्यपालांनी केलं राजभवन येथे वृक्षारोपण

-…म्हणून भाजपच्या ‘या’ महिला आमदाराविरोधात गुन्हा दाखल

-…अन्यथा शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होणार; राज्य सरकारचा नवा आदेश