निसर्ग परीक्षा घेतोय पण आपण ताकदीने सामना करु- उद्धव ठाकरे

मुंबई | निसर्ग आपली परीक्षा घेत आहे, मात्र आपण ताकदीने याचा सामना करु, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी चक्रीवादळाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी ते बोलत होते.

चक्रीवादळ आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी ओसरावं किंवा हवेतच नाहीसं व्हावं, अशी माझी प्रार्थना आहे. या प्रार्थनेला यश मिळेल, पण जे काही दिसत आहे ती शक्यता पाहिल्यानंतर हे वादळ उद्या दुपारपर्यंत आपल्या किनाऱ्यावर धडकणार आहे, उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

किनारपट्टी आणि जवळील भागात चक्रीवादळाचा परिणाम होईल. आपण सज्ज आहोतच. तीनही दलांना सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे. त्याप्रमाणे एनडीआरएफच्या 15 तर एसडीआरएफच्या 4 तुकड्या अशा एकूण 19 तुकड्या विविध भागांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी चक्रीवादळासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्याचंही सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-निसर्ग चक्रीवादळ धडकण्यापूर्वी पावसाचा तडाखा, पाहा कुठे कुठे आहे पावसाचा जोर?

-राज्यपालांनी सरकारचा ‘तो’ आदेश फिरवला, आता नवा वाद सुरु

-‘डॉ. श्रीकांत जिचकर लिडर्स फेलोशीप’ कार्यक्रमाची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून घोषणा

-पुण्यात आज 169 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…