ठाकरे आज पुणे दौऱ्यावर; स्वतः गाडी चालवत ‘मातोश्री’हून पुण्याकडे रवाना!

पुणे | आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहे. उद्धव ठाकरे यांनी पुण्याला येताना स्वत: गाडी चालवत ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्तालयात एक महत्वाची बैठक पार पडणार आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे विभागीय आयुक्तालयात जाऊन पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या बैठकील उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारही उपस्थित असणार आहेत.

या बैठकीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटीलही हजेरी लावणार आङेत. त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जात असून या बैठकीत पाटील प्रश्नांचा भडीमार करणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार दर आठवड्याला पुण्यात आढावा बैठक घेताना दिसतात. परंतु मुख्यमंत्री ‘मातोश्री’तून बाहेर पडत नाहीत. राज्याच्या दौऱ्यावर जात नाहीत, अशी तक्रार भाजपकडून सातत्याने होत होती.

महत्वाच्या बातम्या-

संतापजनक! कोरोना चाचणीच्या नावे तरुणीच्या गुप्तांगातून घेतले स्वॅब!

धक्कादायक! कोरोनामुळे मृत्यु झाल्याने थेट उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच केले सपासप वार

दिलासादायक! 10 ऑगस्ट पर्यंत कोरोनाची लस येणार

‘या’ भाजप आमदाराच्या भावाच्या मॅरेज हॉलवर चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

चांगली बातमी! पुण्यात आज दिवसभरात 2 हजारांहून अधिक रूग्णांची कोरोनापासून सुटका