Top news महाराष्ट्र मुंबई

“महाराष्ट्र पोलीस’ आम्हाला तुमचा अभिमान आहे”

मुंबई | केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील 58 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत.

जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये  उत्कृष्ट सेवा करणाऱ्या 5 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक’, 14 पोलीस शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरिता 39 ‘पोलीस पदक’ जाहीर करण्यात आली आहेत.

महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलिसाचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र पोलीसांचं ब्रीद “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” उंचावणारी कामगिरी केली आहे. या कामगिरीसाठी सर्वांना सलाम, आणि जाहीर पुरस्कारासाठी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मनोरंजन विश्वातल्या ‘या’ लोकप्रिय जोडीनं अखेर घटस्फोट घेतला

…म्हणून सख्या भावानेच भावाला जाळलं; बारामती तालुक्यातील धक्कादायक प्रकार!

‘लग्न करणार तर रामदेव बाबाशीच …’; ‘या’ आयटम गर्लने रामदेव बाबांना लग्नाची मागणी घातली

आजोबा आणि नातवाच्या वादावर रोहित पवार म्हणाले…

धक्कादायक! माहेरी रहात असलेल्या विवाहित भाचीवर सख्ख्या मामानेच केला बलात्कार अन् मग…