मुस्लिम बांधवांना शुभेच्छा… रमजानमुळे समाजातील बंधुभाव अधिक दृढ होईल- उद्धव ठाकरे

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच कोरोनाच्या लढाईमुळए आपल्याला घरातच राहून धार्मिक कार्यक्रम करावे लागणार आहेत. त्यामुळे आपण हे सगळे नियम पाळा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

कोरोना विरुद्धच्या लढ्यात जात धर्म विसरून आपण एकत्र येऊन मुकाबला करीत आहोत. एरव्ही आपण हा सण एकमेकांना भेटून आणि उत्सवासारखा सार्वजनिक ठिकाणी साजरा करतो मात्र आपण यंदा रमजानच्या महिन्यात सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे आणि घरगुती स्वरूपातच धार्मिक कार्यक्रम करावेत असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मुस्लिम धर्मगुरुंनीही या कोरोना संकटात शासनाला चांगली साथ दिली आहे. मी त्यांनाही आवाहन करतो की कुठेही धार्मिक आणि सार्वजनिक स्थळी एकत्र न येता रमजानचा हा पवित्र सण साजरा करू यात आणि आपल्या तसेच समाजाच्या आरोग्याला प्राधान्य देऊ यात, असं ते म्हणाले.

दरम्यान, शनिवार पासून रमाजान महिन्याला सुरूवात होत आहे. रमजानमुळे समाजातील बंधुभाव अधिक दृढ होईल, असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

-तगमगणाऱ्या सर्व जीवांचे दु:ख कलावंत मनाच्या राज ठाकरेंनी सरकारदरबारी मांडलं पण… संजय राऊतांचे शालजोडीतून टोले

-“मुख्यमंत्र्यांनी सांगावं, मी नागपुरात बसल्या बसल्या लाख-दीड लाख पीपीई किट पाठवतो”

-“काँग्रेस पक्षाला मात्र मोदी सरकारवर टीका करण्याशिवाय काहीही दिसत नाही”

-अहमदनगरच्या लेकीचा पराक्रम; आता अवघ्या 15 मिनिटात कळणार कोरोना आहे की नाही…

-पॅरोलवर बाहेर आलेल्या कुख्यात डॉन अरुण गवळीची गरजूंना मदत, पाहा व्हिडीओ