“उद्या दिवसभर घरी, कधीही या”, फडणवीसांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ!

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिवेशनात पेनड्राईव्ह बाॅम्ब फोडला होता. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप लगावले होते. फडणवीसांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं.

बदली पोस्टिंग प्रकरणात बीकेसीतील सायबर पोलिसांत सकाळी 11 वाजता जबाब नोंदवण्यासाठी फडणवीसांना बोलावण्यात आलं होतं. मात्र, गृहमंत्र्यालयात याबाबत चर्चा झाली.

चर्चेनंतर आता पोलीस फडणवीसांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती आहे.  देवेंद्र फडणवीसांनी स्वत: याची माहिती ट्विट करत दिली आहे.

गुन्हे शाखेच्या सहपोलिस आयुक्तांचा मला आतात फोन आला होता, असं फडणवीस म्हणाले. तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही असं आयुक्त म्हणाल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ, असं सहपोलिस आयुक्तांनी सांगितल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे मी दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात, असं ट्विट करत फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मार्केटमध्ये बंपर सेल सुरु, ‘या’ गाड्यांच्या किंमती झाल्या फारच कमी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! होळीपूर्वी सरकारने दिलं ‘हे’ खास गिफ्ट

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्रींचे निधन

फोटोसाठी पोज देत होती महिला, सेकंदात जे काही झालं ते…; पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

“मी मोदींना घाबरत नाही, थेट आव्हान देऊ शकतो”