कोहलीला आता शतक करावंच लागेल! भर सामन्यात विराटचा ‘जबरा फॅन’ बॅनर घेऊन आला अन्…

मुंबई | भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या फाॅममध्ये नाही. मागील कित्येक महिन्यांपासून विराटने क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमध्ये एकही शतक झळकवलं नाही.

अशातच आता भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका होत आहे. पहिला सामना भारताने जिंकल्यानंतर आता दुसऱ्या सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न भारताचा असणार आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 252 धावा बोर्डावर लावल्या. या सामन्यात देखील कोहलीला नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

आज कोहलीला केवळ 23 धावा करता आल्या. आजच्या सामन्याच कोहलीपैक्षा कोहलीच्या फॅनची चर्चा होताना दिसत आहे. आज कोहलीचे अनेक चाहते त्याचा सामना पाहण्यासाठी आले होते.

त्यावेळी एका चाहत्याने एक बॅनर मैदानात आणला. जोपर्यंत विराट कोहली 71वे शतक करत नाही, तोपर्यंत आपण लग्न करणार नाही, असा बॅनर या चाहत्याने आणला होता.

विराट कोहलीने अखेरचं शतक नोव्हेंबर 2019 साली बांगलादेशविरुद्ध केलं होतं. त्यानंतर अद्याप कोहलीला सुर गवसला नाही. त्यामुळे त्याचे चाहते कोहलीला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

“उद्या दिवसभर घरी, कधीही या”, फडणवीसांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ!

मार्केटमध्ये बंपर सेल सुरु, ‘या’ गाड्यांच्या किंमती झाल्या फारच कमी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! होळीपूर्वी सरकारने दिलं ‘हे’ खास गिफ्ट

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्रींचे निधन

फोटोसाठी पोज देत होती महिला, सेकंदात जे काही झालं ते…; पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ