झिका व्हायरसचा कम्युनिटी स्प्रेड झालाय?, अत्यंत धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली | देशात कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू असल्याचं चित्र आहे. परंतु कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यातच आता केरळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान झिका विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला होता. केरळमधील एका मेडिकल जर्नलने दावा केला होता की, दुसऱ्या लाटेमध्ये झिकाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला होता.

या अहवालात सागितलंय की, संक्रमित झालेल्या व्यक्तीमध्ये आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांमध्ये कोणतीच लक्षणे दिसली नाहीत. परंतु, झिकाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.

जेव्हा एखादा रोग स्थानिक पातळीवर पसरू लागतो तेव्हा त्याला संसर्गजन्य रोग म्हणतात. परंतु झिका हा संसर्गजन्य आजार नाही. त्यामुळे आता आरोग्यविभाग चिंतेत आहे.

झिका विषाणूचा पहिला रुग्ण केरळमध्ये 8 जुलै 2021 रोजी आढळून आला होता. झिकाचा पहिला रूग्ण 24 वर्षीय गर्भवती महिला होती. महिलेला ताप आणि डोकेदुखी सुरू झाल्यानंतर दवाखान्यात नेण्यात आलं होतं.

तेव्हा झिका व्हायरसची ओळख झाली. झिका व्हायरस हा संसर्गजन्य आजार नाही पण याची लागण वेगाने होत असल्याचं अहवालातून स्पष्ट झालं आहे.

झिका हा डासांपासून पसरणारा आजार आहे. त्यामध्ये एडिस इजिप्ती या जतीच्या डासाने चावल्यावर हा आजार होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार, एडिस डास सहसा दिवसा चावतात. हे तेच डास असतात जे डेंग्यू, चिकुनगुनिया पसरवतात.

झिका विषाणूचा संसर्ग बहुतेक लोकांसाठी गंभीर समस्या नसला तरी, गर्भवती महिलांसाठी तो धोकादायक ठरु शकतो. झिका व्हायरसवर अद्याप कोणताही लस निर्माण झालेली नाही. केवळ वैद्यकीय उपचाराने रूग्ण बरा होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

IPL Auction 2022: मेगा लिलावापूर्वी रिकी पाँटिंगचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

तरुण पिढीत वेगानं पसरतोय ‘हा’ आजार; सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय व्हिडीओ

IPL Auction 2022: बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय; ‘या’ 3 खेळाडूंच्या गोलंदाजीवर बंदी

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर; तर राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता

पोस्टाची भन्नाट योजना! फक्त 95 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 14 लाख