गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर; ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

पणजी | गोव्यासह उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये नुकतंच निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. अशात 10 मार्च रोजी पाचही राज्यातील निवडणुकांचा निकाल समोर येणार आहे.

सध्या गोव्यात भाजपची सत्ता आहे. भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली होती. त्यामुळे गोव्यात भाजप आणि काँग्रेस यांच्या काँटे की टक्कर असणार आहे.

दोघांमध्ये मोठी स्पर्धा असून, भाजप सत्ता कायम रखणार की, काँग्रेस सत्तेत येणार हे सांगता येत नाही. मात्र कॉंग्रेस आणि भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्याने आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोव्यात मुख्यमंत्री कुणाचा?  या विषयी राजकीय वर्तुळात औत्सुक्य निर्माण झालं आहे.

गोव्यत मुख्य लढत जरी काँग्रेस-भाजपमध्ये होत असली तरी उत्पल पर्रीकरांसह अनेक अपक्षांनी देखील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढवली आहे. सोबतच शिवसेना देखील या निवडणुकीत जोमाने उतरलेली पाहायला मिळाली.

डॉ. प्रमोद सावंत हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. प्रमोद सावंत हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत.

यापूर्वी कधीही मंत्री झाले नाहीत. परंतू 2019 साली गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत विराजमान झाले.

दिगंबर कामत (काँग्रेस) – मडगाव, मनोहर आजगावकर (भाजप) – मडगाव, अमित पालेकर (आप) – सांताक्रूझ, मायकल लोबो (काँग्रेस) – कळंगुट, उत्पल पर्रिकर (अपक्ष) – पणजी. गोव्यात या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गोव्याच्या निवडणुकीत शिवसेना देखील जोमाने उतरली होती. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील शिवसेनेच्या उमेदवारांसाठी याठिकाणी प्रचारसभा घेतल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या- 

निकालाच्या 12 तास अगोदर गोव्यात हालचालींना वेग; काँग्रेसचे दिग्गज नेेते गोव्यात दाखल 

“महाविकास आघाडी सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही” 

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…’माझ्याकडे पण…’ 

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी! 

“मुख्यमंत्री साहेब आता शेती परवडत नाही, वाईन विक्रीची परवानगी द्या”