Election Results 2022 | 5 राज्यांचं भवितव्य ठरणार; कोणाचं सरकार येणार?

मुंबई | उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांतील नागरिकांचा मतकौल आज स्पष्ट होईल. सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला कल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होतील.

पाच राज्यांपैकी सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election Result 2022) निकालावर लागलंय. उत्तर प्रदेशातील मतदारांचा कौल कोणत्या राजकीय पक्षाला मिळणार यावर देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे.

मागच्यावेळी एक नंबरचा पक्ष असूनही गोव्यात सत्ता स्थापन करण्यात अयशस्वी ठरलेल्या काँग्रेसला भाजपाची धास्ती असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांनी आत्तापासून प्रत्येक आमदाराच्या हालचालीवरती लक्ष ठेवलं असून मोर्चेबांधणीला सुरूवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे.

पंजाबमध्ये केजरीवालांच्या आम आदमी पार्टीची सत्ता पंजाबमध्ये येईल, असं बोललं जातंय. टुडेज चाणक्यने निवडणुकीबाबत आपला अंदाज वर्तवला आहे. चाणक्यने वर्तवलेल्या अंदाजानुसार सर्वाधिक जागा मिळणारा पक्ष म्हणून पंजाबमध्ये आप समोर येईल, असं सांगण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये भाजपची पुन्हा सत्ता येईल असा अंदाज आहे. तर गोवा आणि उत्तराखंडमध्ये भाजपसाठी धोक्याची घंटा वाजण्याची शक्याता आहे.

गोव्यात कुठल्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसून येत नाहीये. तर दुसरीकडे उत्तराखंडमध्येही अशीच स्थिती तयार होण्याची शक्यात या एक्झिट पोलने वर्तवली आहे. त्यामुळे निकालानंतर भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

निकालाच्या 12 तास अगोदर गोव्यात हालचालींना वेग; काँग्रेसचे दिग्गज नेेते गोव्यात दाखल 

“महाविकास आघाडी सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही” 

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…’माझ्याकडे पण…’ 

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी! 

“मुख्यमंत्री साहेब आता शेती परवडत नाही, वाईन विक्रीची परवानगी द्या”