काँग्रेसला मोठं खिंडार; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

भोपाळ | कर्नाटक नंतर आता मध्यप्रदेशमध्ये सत्तेचं नाट्य रंगलं आहे. कमलनाथ सरकारच्या तब्बल 22 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. एकाचवेळी 22 मंत्र्यांनी राजीनामे दिल्यामुळे काँग्रेस अडचणीत सापडलं आहे.

सर्वांचे फोन स्वीच ऑफ आहेत आणि ते कुठे आहेत याची माहिती अद्याप दिली गेलेली नाही. हे सर्व आमदार आणि मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे पक्षावर नाराज असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे शिंदे समर्थक आमदार भाजपात प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

कर्नाटकमध्ये भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता काबीज केली. त्यानंतर भाजपने आपला मोर्चा मध्य प्रदेशकडे वळवला. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये मध्य प्रदेशच्या राजकारणात हालचालींना वेग आलाआहे.

काँग्रेस सरकारमधले काही मंत्रीच बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचं बोललं जात आहे. तसंच, काँग्रेसचे 6 मंत्री आणि 11 आमदार बंगळुरूमध्ये असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोना पुण्यातही धडकला, दोन संशयित रूग्ण आढळल्याने खळबळ

-भाजपवाल्यांनो, यंदाच्या होळीत तुमचा अहंकार आणि सत्तेचा माज जाळा- अमोल मिटकरी

-“मनसेने स्वबळावर 39 मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाची स्थापना केली… याला म्हणतात स्वाभिमान!”

-माझी सटकली तर तुझी वाट लागेल; पुतण्याच्या मतदारसंघातून जाऊन अजित पवारांचा दम

-अहो, अजितदादा सध्या तुम्हीच मुख्यमंत्री आहात; चंद्रकांत पाटलांची फटकेबाजी