कोरोना पुण्यातही धडकला, दोन संशयित रूग्ण आढळल्याने खळबळ

मुंबई | जगभरात कोरोना संसर्गाचं थैमान सुरु असताना याच्या थेट झळा भारतालाही बसल्या आहेत. देशभरात 40 हून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. आता महाराष्ट्रातही कोरोनाने शिरकाव केला आहे.

महाराष्ट्रातील पहिला रुग्ण पुण्यात आढळला आहे. पुण्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित रुग्ण नुकतेच दुबईला जाऊन आल्याचीही माहिती मिळत आहे.

दुबईहून आलेल्या या रुग्णांना तातडीने नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करुन तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.

दरम्यान, दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी एका रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. दुसऱ्या रुग्णामध्ये अद्याप लक्षणे आढळून आलेली नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपवाल्यांनो, यंदाच्या होळीत तुमचा अहंकार आणि सत्तेचा माज जाळा- अमोल मिटकरी

-“मनसेने स्वबळावर 39 मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाची स्थापना केली… याला म्हणतात स्वाभिमान!”

-माझी सटकली तर तुझी वाट लागेल; पुतण्याच्या मतदारसंघातून जाऊन अजित पवारांचा दम

-अहो, अजितदादा सध्या तुम्हीच मुख्यमंत्री आहात; चंद्रकांत पाटलांची फटकेबाजी

…म्हणून भारतात पेट्रोल-डिझेल होणार सहा रुपयांनी स्वस्त…!