सत्ता गेल्याने भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय’; काँग्रेसची टीका

मुंबई | सत्ता गेल्याने भाजप नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. याच वैफल्यातून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. सतत लोकांना सल्ले देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना आमचा प्रेमाचा सल्ला आहे. भाषेचे भान राहुद्या नाहीतर फुकट शोभा होईल!, अशा आशयाची फेसबूक पोस्ट करत काँग्रेसने भाजपला इशारा देत पाटलांलर निशाणा साधला आहे.

काँग्रेसने शिवसेनेला हिंदूत्वापासून दूर करत आहे. मी शिवसेनेचा हितचिंतक आहे. ते होते म्हणून मराठी माणूस, हिंदू माणूस वाचला. काँग्रेस शिवसेनेला दूर नेत आहे आणि त्याच्या बदल्यात मनसेला जागा करून दिली जात आहे, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

सर्वसामान्य जनतेच्या मनात मनसे आणि भाजप येत आहे याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करावा, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, काँग्रेसने पाटलांना दिलेल्या या प्रेमाच्या सल्ल्यावर चंद्रकांत पाटील काय प्रत्युत्तर देतात?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-…म्हणून दिली ठाकरे सरकारने वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटला 51 हेक्टर जमीन

-उद्धव ठाकरेेंच्या मंत्रिमंडळातील ‘या’ दोन मंत्र्यांच्या जीवाला धोका; केली सुरक्षा वाढवण्याची मागणी

-केदार जाधव, मुक्ता बर्वे, धर्मकिर्ती सुमंत यांना पुणे विद्यापीठाचा ‘युवा गौरव पुरस्कार’

-मोदी सरकार देवेंद्र फडणवीसांचा केंद्रीय मंत्रिमंडळात उपयोग करून घेणार?

-“भारत माझा देश आहे, पण तो पाकिस्तानी आणि बांगलादेश घुसखोरांचा नाही”