…म्हणून उद्धव ठाकरेंनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला दिली 51 हेक्टर जमीन!

मुंबई | राज्य सरकारने वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटला जालना जिल्ह्यात 51 हेक्टर जमीन दिल्याचं कळतंय. यावरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. शरद पवार हे या संस्थेशी संबंधित असून त्यामुळेच सर्व नियम डावलून हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे.

संस्थेला जमीन देण्याचा प्रस्ताव हा गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असल्याची माहिती आहे. याआधी महसूल विधी आणि न्याय विभागाने यावर आक्षेप घेतला होता. मात्र ठाकरे सरकारने सर्व आक्षेप धुडकावत संस्थेला जमीन देण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

ऊस संशोधनासाठी ही जमीन वापरण्यात येणार असल्याने नियमांना अपवाद करून हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारने सांगितलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान, ठाकरे सरकारच्या या निर्णयावरून भाजप शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-उद्धव ठाकरेेंच्या मंत्रिमंडळातील ‘या’ दोन मंत्र्यांच्या जीवाला धोका; केली सुरक्षा वाढवण्याची मागणी

-केदार जाधव, मुक्ता बर्वे, धर्मकिर्ती सुमंत यांना पुणे विद्यापीठाचा ‘युवा गौरव पुरस्कार’

-मोदी सरकार देवेंद्र फडणवीसांचा केंद्रीय मंत्रिमंडळात उपयोग करून घेणार?

-“भारत माझा देश आहे, पण तो पाकिस्तानी आणि बांगलादेश घुसखोरांचा नाही”

-रजनीकांत भाजपचे पोपट आहेत- पी.चिदंबरम