काँग्रेसचे ‘हे’ विद्यमान आमदार भाजपच्या वाटेवर???

धुळे : साक्री विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार डी. एस. अहिरे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा साक्री मतदारसंघात सुरु आहे. साक्री मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

धुळे जिल्ह्यातील साक्री मतदारसंघ हा संपूर्ण जिल्ह्यात महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. गेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे डी. एस. अहिरे यांनी भाजपच्या मंजुळा गावित यांचा पराभव केला होता. डी एस अहिरे यांनी मंजुळा गावित यांचा 3,323 मतांनी पराभव केला होता. अत्यंत कमी मतांनी मंजुळा गावित यांचा पराभव झाल्याने काँग्रेससाठी ही चिंतेची बाब आहे  

लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला मिळालेलं मताधिक्य पाहता विधानसभा निवडणुकीत भाजपचं पारडं जड राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे डी. एस. अहिरे भाजपच्या तिकिटावर साक्री मतदारसंघातून उभे राहतील असं बोललं जात आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत साक्री लोकसभा मतदारसंघातून भाजपाला मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळालं होत. साक्री तालुका नंदुरबार लोकसभा मतदारसंघात येतो. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार हिना गावित यांना या तालुक्यातून सहा लाख 39 हजार 126 मते मिळाली होती. 

यंदाच्या होणाऱ्या निवडणुकीत मंजुळा गावित या भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात असतील, असंही बोललं जातं आहे. त्यामुळे अहिरे यांना तिकिट मिळेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

महत्वाच्या बातम्या-