“महिला हिजाब घालत नाही म्हणून बलात्कार होतात”

नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते जमीर अहमद यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महिला हिजाब घालत नाही म्हणून बलात्कार होतात, असा अजब तर्क जमीर अहमद यांनी लावला आहे.

हिजाब म्हणजे इस्लाममध्ये पर्दा. महिलेचं सौंदर्य लपविण्यासाठी हा पर्दा असतो. महिला जेव्हा हिजाब घालत नाही तेव्हा त्यांचा बलात्कार होतो. हिजाब महिलांचं सौंदर्य लपवतो. आज भारतात बलात्काराचे प्रमाण जास्त आहे. कारण महिला आता हिजाबमध्ये राहत नाही, असं वादग्रस्त वक्तव्य जमीर अहमद यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.

दरम्यान, हिजाब विवादामुळे कर्नाटक सरकारने कनिष्ठ महाविद्यालयांच्या सुट्ट्या 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवल्या आहेत. वाढत्या वादामुळे राज्य सरकारने 9 फेब्रुवारीपासून महाविद्यालयं बंद करण्याचे आदेश दिले होते आणि ही मुदत 14 फेब्रुवारीपर्यंत होती.

या शिवाय सरकारने 16 फेब्रुवारीपर्यंत पदवी आणि डिप्लोमा महाविद्यालयांनाही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी हा बंदचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्य प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, कर्नाटकातील कॉलेजमधून सुरू झालेला हिजाब वाद आता देशभऱात पसरू लागला आहे. देशभरातून या वादावर पडसाद उमटले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

राष्ट्रवादीला मोठा झटका, ‘इतक्या’ नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

रूपाली पाटलांची किरीट सोमय्यांवर टीका, म्हणाल्या, ‘लबाड लांडगा…’ 

“…तर मीही अण्णा हजारेंसोबत उपोषणाला बसेल” 

“सरकार गेल्यापासून देवेंद्र फडणवीस फ्रस्ट्रेशनमध्ये”

“नाना तू उद्या सागरवर येऊन दाखव, पाहतो तू कसा परत जातो”