मोठी बातमी! काँग्रेसचा राष्ट्रवादीला मोठा झटका

मुंबई | औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp), भाजप, एमआयएम व इतर पक्षातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अशोक चव्हाण, महाराष्ट्र केसरी, मराठी बातम्या,

नगरपालिकेच्या 4 विद्यमान नगरसेवकांनी आणि दोन जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेश काँग्रेसचे सचिव सुरेश नागरे यांच्या नेतृत्वाखाली या सर्व नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपडकर, आमदार अमर राजूरकर, माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश संघटन सरचिटणीस देवानंद पवार, विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मदन जाधव उपस्थित होते.

आज काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षात स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षातील अनेक नेते व पदाधिकारी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत परंतु आम्ही कोणालाही प्रलोभने दाखवून काँग्रेसमध्ये प्रवेश देत नाही. परभणी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने इतरपक्षातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश घेत असून परभणी जिल्हा आत काँग्रेसमय झाल्याशिवाय राहणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.

आजच्या पक्ष प्रवेशाने परभणी, नांदेड व औरंगाबादमध्ये काँग्रेस पक्षाचे संघटन आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. सरकार पाडण्याची स्वप्न दररोज पाहिली जात आहेत पण दोन वर्षे झाली सरकार काही पडत नाही या नैराश्येने भाजपला ग्रासलं आहे. त्यातून वारंवार सरकार पडण्याच्या तारखा सांगितल्या जात आहेत. महाविकास आघाडीचे सरकार भक्कम असून पाच वर्ष हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या- 

रूपाली पाटलांची किरीट सोमय्यांवर टीका, म्हणाल्या, ‘लबाड लांडगा…’ 

“…तर मीही अण्णा हजारेंसोबत उपोषणाला बसेल” 

“सरकार गेल्यापासून देवेंद्र फडणवीस फ्रस्ट्रेशनमध्ये”

“नाना तू उद्या सागरवर येऊन दाखव, पाहतो तू कसा परत जातो”

  Jayprabha Studio: “आमचं चुकलं असेल तर मी राजकीय संन्यास घेईन”