“देश कोरोनाच्या संकटात असताना पेट्रोल डिझेलवरचं उत्पादन शुल्क वाढवणं चुकीचं”

नवी दिल्ली | सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर उत्पादन शुल्क वाढवलं आहे. पेट्रोलवर प्रति लिटर 10 आणि डिझेलवर 13 रुपये अशा रितीने हे उत्पादन शुल्क वाढवण्यात आलं आहे.

मोदी सरकारचा हा निर्णय म्हणजे एक चुकीचं पाऊल आहे. हा निर्णय मागे घेतला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा भार तेल कंपन्यांवर पडणार आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटसोबत एक व्यंगचित्रही पोस्ट केलं आहे. यामध्ये सामान्य माणूस पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे घाबरुन हात वर करुन उभा आहे असं दिसतं आहे.

केंद्र सरकारनं घेतलेला हा निर्णय 6 मे पासून लागू करण्यात आला आहे. मात्र या निर्णयावर राहुल गांधी यांनी टीका केली असून मोदी सरकारने हा निर्णय मागे घ्यावा असंही म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-“नक्की नियंत्रणात काय, कोरोनाची स्थिती का आमदारकी?”

-“शाहू राजांनी तोफा वितळवून नांगर बनवले आणि महाराष्ट्राने फडणवीसांचा माज उतरवून भंगार बनवलं”

-राज्यात अडकलेल्या लोकांना गावी सोडण्यासाठी  एसटी सेवा देणार- विजय वडेट्टिवार

-’17 मेनंतर काय करणार?’; सोनिया गांधींचा केंद्र सरकारला सवाल

-…म्हणून चंद्रकांत पाटलांचा लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीला विरोध